Sunday, December 17, 2006

" आई "

िदवसभर िकतीही दंगा केला
तरी मला थोपटल्यािशवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी िवचारतं ..
" तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली िमठी सोडवत नाही

आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाि ठ डबा करायचा नसतो
तरीि ह तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर ...
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी िबंनधास्त होत ोे
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या िपलांसाठी
सगळं केलंस ...
एक िदवस िपलं म्हणाली,
" आई आता आम्हाला जायचंय" ...
आिण तू त्यांना जाऊ िदलंस

आई, तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळं आहे
घरापासून दूर
जग खूप वेगळं आहे... :-(

Poet: Anonymous