Friday, February 8, 2008

......तर महाराष्ट्र असाच धगधगत राहणार

......तर महाराष्ट्र असाच धगधगत राहणार


काय आत्ता मिळणार हात पाय तोडून, डोकी फोडून
तुम्हीच त्यांना जवळ केलत ना, मतांसाठी हात जोडून
केलात विचार त्यावेळी बाणाला दूर दिल्लीत सोडू.....
चिखलात जावून कमळा बरोबर मैत्रीचं नातं जोडू......

मग आले सगळे मुंबईत काम करायला
तुमच्याच तोंडातले घास ओरबडायला
म्हणता म्हणता दिल्ली, बिहार अख्खा उत्तरप्रदेश आला
आपल्याच नजरेसमोर आपलाच महाराष्ट्र त्यात हरवून गेला

हजारोंच्या संखेने रोज इथे येतात
येऊ दया, येऊ दया आपल्यालाच ते मते देतात
फळे, भाजीपाला सर्व व्यवसाय त्यांनी ओढले
मासळी बजारातील कोळीणीला पण नाही सोडले

दिवस रात्र काम करतात आणि मोबदला पण घेतात कमी
चाची मौसी बोलून पाडतात भूरळ देतात चांगल्या मालाची हमी
का मराठी माणसाला हे कधी जमले नाही
कारण आमचे मन कधीच व्यवसायात रमले नाही.....

धावत धावत लोकल पकडून दहा वाजता ऑफिसला जायचं
बायकोनं दिलेला डबा खाउन दुपारी थोडसं डूलकायचं
संध्याकाळी काम केलं तर केलं नाहीतर राहिलं
नायडू, शर्मा, वर्मा अशा बॉसच्या हाताखालचं मांजर व्हायचं

डुबले तर काय होईल या विचाराने कधी व्यवसाय केला नाही
दूसरा कोणी करत असेल तर आम्हाला पाहावले नाही
मराठी माणसानेच मराठी माणसाचा पाय ओढला
बोलवून उप-यांना महाराष्ट्रात स्वतःच्या पायावर धोंडा पाडला

मग आत्ता काय करायचं या विचाराने पेटून गेले
फुटून, तूटून होवून वेगळे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण केले...??
कसले काय आणि कसले काय.....बाण नाही पोहोचला दूर
म्हणुनच हा आत्ता आपापसातील वादाचा सुर.......

यात सामान्य मराठी माणूस भरडला जाणार
कोणी बाणा सांभाळणार तर कोणी नव निर्माणनाचे स्वप्न पाहणार
अशाच होतील दंगली मारामा-या परप्रांतीयां बरोबर
थांबले नाहीत येणारे लोंढे......तर महाराष्ट्र असाच धगधगत राहणार